Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*केज येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 17, 2024No Comments3 Mins Read

*केज येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद*

*एकूण ३ लाख ८५ हजार ८१ मतदारा सह ६ तृतीय पंथी आणि ६ हजार २९६ नव मतदार बजावणार मतदानाचा हक्क*

*४२० मतदान केंद्रा पैकी १८ मतदान केंद्र संवेदनशील*

गौतम बचुटे/केज :- केज येथे विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकी संदर्भात माहिती देण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी पत्रकार परिषदे घेवून माहिती दिली.

केज विधान सभा निवडणुकीची माहिती देण्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी दि. १७ ऑक्टोबर रोजी केक तहसील कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, केज विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघात केज, अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील काही गावांचा समावेश असून त्या सर्वांचा मिळून केज विधानसभा मतदार संघ तयार झालेला आहे. केज मतदार संघात ऐकूण ३ लाख ८५ हजार ८१ एवढी मतदार संख्या आहे. त्या पैकी २ लाख १६ हजार ३२ पुरुष तर १ लाख ८३ हजार ४४३ महीला आणि तृतीय पंथी ६ मतदार आहेत. त्या पैकी सर्वात जास्त मतदार संख्या ही केज तालुक्यातील आहे. ती संख्या २ लाख ११ हजार ४८९ एवढी आहे. त्या पैकी असून १ लाख १० हजार ९७० पुरुष आणि १ लाख ५१८ महीला तर १ तृतीय पंथी. तसेच त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यातील एकूण मतदार १ लाख ३८ हजार ७३१ अशी आहेत. त्या पैकी ७२ हजार ३० पुरुष तर ६६ हजार ६९६ महीला आणि ५ तृतीय पंथी यांचा समावेश आहे. बीड तालुक्यातील मतदारांची संख्या कमी असून एकूण ३४ हजार ६८१ मतदार आहेत. त्या पैकी १८ हजार ६३२ पुरुष तर १६ हजार २२९ महीला मतदार आहेत.
या मतदार संघात ४२० मतदार केंद्र असून त्या पैकी १८ मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्र आहेत. एकूण मतदान केंद्रा पैकी ५०% मतदान केंद्रावर सीसिटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच मतदार संघाच्या प्रवेशद्वारावर मुख्य रस्त्याने प्रवेश होत असलेल्या अंबासाखर कारखाना वाघाळा, कासारी पाटी, नेकनुर आणि मांगवडगाव पाटी येथे स्थिर पथके तैनात करण्यात येत आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांनी दिली. यावेळी त्यांचे सोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे, गट विकास अधिकारी प्रियांका टोंगे आणि समृद्धी दिवाणे या उपस्थित होत्या.

————————————————————–

लोकसभा निवडणुकी नंतर केज मतदार संघात ६२९६ नव मतदारांची वाढ झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी केज विधानसभा मतदार संघात ३ लाख ७८ हजार ८८८५ मतदार होते. त्यात वाढ होवून आता ३ लाख ८५ हजार ८१ मतदार संख्या झाली आहे.
—————————————————————–
*दिव्यांग आणि वयोवृध्द नागरिकांसाठी घरी मतदान करण्याची व्यवस्था :-* केज विधानसभा मतदार संघात २ हजार ११६ मतदार दिव्यांग आहेत. तर ८५ वर्षा पेक्षा जास्त वय असलेले ८ हजार २८९ मतदार असून त्यांना घरी मतदान करण्याची सोय करण्यात आलेली आहे.
———————————————————————
विधान सभा लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराला ४० लाख रु. खर्चाची मर्यादा असून उमेदवारी दाखल करताना ५ हजार रु अनामत रक्कम असणार आहे.
——————————————————————-

*आपले नाव यादीत तपासा :-* मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांनी यादीत त्यांचे नाव तपासून पहावे आणि जर नाव नसेल तर १९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल केल्या नंतर पुरवणी यादीत नाव समावेश होणार आहे.
——————————————————————

निवडणुकी दरम्यान २२ ऑक्टोबर पासून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार असून निवडणुकीचे सर्व परवाने हे एक खिडकी योजने द्वारे एकाच कार्यालयातून देण्यात येणार आहेत.
—————————————————————-

विजयराज आरकडे

Post Views: 47
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 6
Total Users : 148136
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.