गंगा माऊली चे बॉयलर शुभारंभ संपन्न
(कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस तर डिसेंबर नंतर पगारवाढ)
——————–
केज दि.१७ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विश्वास पात्र असलेल्या गंगा माऊली शुगर या कारखान्याचे गुरुवारी दि.१७ रोजी बॉयलर अग्नी प्रतीपदन सोहळा पार पडला यावेळी सुरू होणारा हंगाम देखील किमान ५ लाख उसाचे गाळप होणार असा विश्वास कारखान्याचे संचालक प्रविण मोरे यांनी बोलताना व्यक्त केला. तर कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांच्या सूचनेनुसार दिवाळीचा बोनस म्हणून कर्मचाऱ्याला एक पगार जादा तर येत्या डिसेंबर नंतर कर्मचाऱ्याच्या पगारात देखील वाढ करण्याचा मानस असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रविण मोरे यांनी सांगितले.
गंगा माऊली शुगर च्या तृतीय गळीत हंगामाचा बॉयलर आज हभप भगवान महाराज, हभप हरिहर महाराज दिवेगावकर, हभप उद्धव बापू आपेगावकर यांच्या शुभ हस्ते तर माऊली विद्यापीठाचे सचिव आदित्य पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, गंगा माऊली शुगरचे व्हा. चेअरमन हनुमंत काका मोरे, संचालक राहुल सोनवणे, अविनाश मोरे, प्रविण मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन नवनाथ थोटे यांचे हस्ते सपत्नीक बॉयलर पूजन करण्यात आले.
यावेळी आदित्य पाटील यांनी देखील बोलताना सांगितले की, कारखान्याच्या बाबतीत खा. रजनीताई व अशोक पाटील यांनी जे स्वप्न पाहिले होते ते आज कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांच्या प्रयत्नाने सत्यात उतरत आहे याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे यापुढे देखील आम्ही हा कारखाना शेतकरी, ऊसतोड मजूर व कर्मचारी यांच्या हितासाठी कटिबध्द असून कायम ही नाळ जोपासली जाईल अस मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रंगी राहुल सोनवणे, राजेसाहेब देशमुख यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाला बाबाराजे देशमुख, प्रकाश भन्साळी, प्रविणकुमार शेप, पशुपतिनाथ दांगट यांचे सह ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुजावर, मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक यांचे सह सर्व विभागाचे प्रमुख, व कर्मचारी उपस्थीत होते.
सोबत फोटो
