Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मांजरा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण खा.बजरंग बप्पा सोनवणेंच्या हस्ते जलपूजन संपन्न

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 28, 2024No Comments2 Mins Read

मांजरा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

खा.बजरंग बप्पा सोनवणेंच्या हस्ते जलपूजन संपन्न

 

केज/प्रतिनिधी
यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला त्यामुळे धनेगाव येथील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आशेचा किरण आहे. जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन खा बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केले.

केज तालुक्यातील धनेगाव येथे असलेला मांजरा धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यानिमित्ताने शनिवार (दि.28) रोजी जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खा.बजरंग बप्पा सोनवणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आपली शेती समृद्ध करण्यासाठी, जलसंपत्तीचे महत्त्व आणि तिचा योग्य वापर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. हा प्रकल्प झाल्यापासून शेतीक्षेत्र ओलीताखाली आले आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. परंतू यावर्षी मुबलक पाऊस पडला आहे.त्यामुळे सर्वत्र ठिकाणचे जलस्रोत भरले आहेत.यावेळी खासदार बजरंग बप्पा सोनवणे असेही म्हणाले की मांजरा धरणातील साचलेल्या पाणी साठ्याची जलपूजन आपल्या हस्ते होत आहे. त्याचा आपल्याला आनंद असून येणाऱ्या काळात आपण सर्वजन मिळून विकासाच्या कामांची पायाभरणी करणार आहोत. कारण जिल्ह्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास साधला जाईल. असा शब्द खा.बजरंग सोनवणे यांनी जलपूजन करतावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी माजी आ.पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा संजीवनीताई देशमुख, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर भैय्या देशमुख, केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव, केज विधानसभेच्या नेत्या अंजलीताई घाडगे, रमेशतात्या गालफाडे, शितलताई लांडगे,
माजी पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, गुंडाप्पा भुसारी, मुकुंद कणसे, कपिल मस्के, सय्यद शरीफ, भाऊसाहेब गुंड, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सभासद आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 63
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 4 0
Total Users : 149340
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.