Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

अपहरणाच्या संशयावरून केज पोलीसात चौघा विरूध्द गुन्हा दाखल

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 24, 2024No Comments3 Mins Read

अपहरणाच्या संशयावरून
केज पोलीसात चौघा विरूध्द गुन्हा दाखल

 

गौतम बचुटे/केज :- अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संशयावरून एकाला जमावाने पकडुन त्याला बदडून त्याच्या गाडीची नासधूस केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथे दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास परमेश्वर नारायणराव मस्के यांचा
मुलगा अंकुर हा घरी आला व त्याने त्याची आईला सांगीतले की, मागील दोन दिवसा पासुन एका चार चाकी कार मधून दोघे त्याचा शाळेत जाताना माझा पाठलाग करत आहेत. त्या पैकी एक अनोळखी इसम ज्याला दाढी असलेला हा पण दोन दिवसा पूर्वी त्याला चॉकलेट देतो. तु माझ्या सोबत गाडी मध्ये बस. असे म्हणाला. ही घटना परमेश्वर मस्के यांना त्यांच्या पत्नीने घरी सांगितले. त्यामुळे त्या दिवसा पासून अंकुर याला शाळेत सोडायला कुटुंबातील कोणी तरी जात होते.
दि. २१ रोजी अंकुरचे वडील परमेश्वर मस्के यांना काम असल्याने त्यांनी अंकुर याला त्यांच्या नातेवाईकांचे मुला सोबत शाळेत पाठवले. दुपारी २:०० वा. च्या सुमारास अंकुर याने त्याच्या वडिलांना सांगीतले की, गळ्यात रुद्राक्षाची माळ असलेल्या दाढीवाल्या इसम त्याच्या मोटार सायकलीला भिक्षा मागण्यासाठीचे पिवळ्या रंगाचे पात्र असलेला इसम हा अंकुर याचा मंगळवार पेठ पासुन पाठलाग करत धारूर चौका पर्यंत आला होता. अंकुरने सांगीतले की, हाच माणुस माझा वारंवार पाठलाग करत आहे. असे सांगीतल्यावर त्याच्या सोबतच्या शाळेच्या मुलींनी हातात दगड घेतले तेंव्हा तो तेथुन मोटार सायकलवर पळुन गेला होता.
________________________________

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार
असा घडला प्रकार
——————————–
दि. २३ रोजी परमेश्वर मस्के यांचे सोबत यांचा भाच्चा प्रबुध्द बनसोडे, बहिण सुनीता गणपत कांबळे हे सकाळी ९:३० वा. चे सुमारास अकुंर याचा पाठलाग कोण करत आहे ? हे पाहण्यासाठी गेले. काही अंतरावर अंकुर याला पायी शाळे जाण्यासाठी सांगीतले. त्या नंतर अंकुर हा मंगळवार पेठ टि कॉर्नर येथे आला. त्यांने त्याचा पाठलाग करणारी निळ्या रंगाची कार मच्छी मार्केटच्या समोर केज ते बीड जाणारे रोडवर पाहिली. त्याने प्रबुध्द याला सांगीतले की, त्याचा पाठलाग करणारी निळ्या रंगाची गाडी ही आहे. असे सांगीतल्यामुळे ते गाडीजवळ आले. त्या गाडीचे बाजुला टपरीचे पाठिमागे त्यांनी जावुन पाहिले तेव्हा तेथे दोन मानसे होते. त्या पैकी अंकुर यांनी सांगीतले की, चॉकलेट देणारा दाढीवाला मानसा सोबत चार चाकी गाडी मधील दुसरा दाढीवाला मानुस हाच आहे. इतर दोन मानसे कोण आहेत हे माहित नाही असे सांगीतले. त्यापैकी एक अनोळखी दाढीवाला मानुस जागेवर मिळुन आला. दोघे जिरायत खात्यामध्ये पळुन गेले. नंतर ते गाडी जवळ आले तेव्हा तेथे खुप लोक जमले होते. तेथे एक दाढीवाला ईसम आला व माझा मुलगा अंकुर यांनी सांगीतले की, हाच चॉकलेट देतो असे म्हणणारा तो दाढीवाला मानुस आहे. असे म्हणताच तो दाढीवाला मानुस गर्दीचा फायदा घेवुन तेथुन निघुन गेला. त्यानंतर त्या अनोळखी इसमाची चौकशी केली असता त्याचे नाव धनराज वळसे असल्याचे समजले. त्यानंतर तेथे पोलीस आले व पोलीसांनी सदर निळ्या रंगाचे गाडीचा नंबर पाहीला तो (एम एच १२/ एच व्ही ७०९९) दिसला. ती गाडी हि धनंजय वळसे यांची असल्याचे समजले व पकडलेल्या अनोळखी ईसमाचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव विजय गोपीनाथ भंडारी (रा. सणसर ता. इंदापुर जि. पुणे) असे असल्याचे समजले.

परमेश्वर मस्के यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात धनराज वळसे (रा. केज), विजय गोपीनाथ भंडारी (रा. सणसर ता. इंदापुर जि.पुणे) आणि दोन अनोळखी यांच्या विरुद्ध गु. र. नं. ५०६/२०२४ भा. न्या. सं. १४०(३), ६२,३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.
—————————–
पालकांनी सतर्क रहावे मात्र अफवांवर विश्वास ठेवू नये
पि. आय. महाजन
—————————–
अशा घटनेनंतर सोशलमिडीयावरून अनेक अफवा पसरवणार्या पॊस्ट पसरवल्या जातात त्याची खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. सतर्क राहून संशयीत इसम किंवा घटना जाणवत असेल तर पोलिसांशी संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 65
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 6
Total Users : 148116
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.