*लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर जीवन गौरव पुरस्कार डॉ. एकनाथ शेळके व धर्मराज थोरात यांना प्रदान*
केज ( प्रतिनिधी)
केज येथील वसंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सह.पत संस्था यांच्या वतीने दरवर्षी शेती, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांना लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.या वर्षी आरोग्य क्षेत्रातुन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील डॉ.एकनाथ शेळके व आदर्श शेतकरी पांगरी येथील धर्मराज थोरात यांना लोकनेते बाबुरावजी आडसकर पुरस्कार अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,धारूर चे नगराध्यक्ष डॉ . स्वरुपसिंह हजारी, शेषेराव फावडे, अर्जुन गायकवाड यांच्या हस्ते धारुर येथे प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेशराव आडसकर हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून धारुर येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ.हजारी, शेषेराव फावडे, अर्जुन गायकवाड,सभापती महादेव तोंडे, उपसभापती सुनिल शिनगारे व इतर उपस्थित होते.
या पुरस्कार वितरणाची सुरु वात छत्रपती शिवाजी महाराज,कै.बाबुरावजी आडसकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन वसंत कर्मचारी सहकारी पतसंस्था केज यांनी केले होते.वार्षिक बैठक व पुरस्कार वितरण व वैद्यकीय क्षेत्रातील पाल्यांचा सत्कार असा त्रिवेणी संगम झाला होता.
या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ.हजारी, शेषराव फावडे व अर्जुन गायकवाड यांनी कै.माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांच्या कार्याचा उल्लेख करून आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्षीय समारोप करतांना रमेशराव आडसकर यांनी कै.माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांनी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण व सहकार यांची रुजवून केली होती.पुढे शारदा इंग्लिश स्कूल, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज,तंत्र निकेतनची भर टाकुन शैक्षणिक दालन खुले केले आहे असे सांगितले. या प्रसंगी पुरस्कारप्राप्त डॉ.शेळके व धर्मराज थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शाहु साखरे, प्रास्ताविक व अहवाल वाचन चेअरमन सुरेश शिनगारे यांनी केले तर आभार सचिव बालासाहेब घुगे यांनी मानले.
