Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*आरोग्य विभागातील भर्ती संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 30, 2024No Comments2 Mins Read

*आरोग्य विभागातील भर्ती संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

गौतम बचुटे/केज (बीड) :- बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेविका पदासाठी जी एन एम आणि बी एस्सी नर्सिंग यांची निवड करून त्यांनाही संधी देण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा अंतर्गत सरळ सेवेने आरोग्यसेविका पदाच्या भरती संदर्भात झालेल्या लेखी परीक्षे नंतर त्यांची गुणवत्ता यादी आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झाल्या नंतर दि. २८ ऑगस्ट पासून त्यांच्या कागद पत्रांची पडताळणी ही जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत सुरू आहे मात्र ज्या विद्यार्थिनींनी जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग ही पात्रता व अहर्ता आहे त्यांना संधी नाकारणार असल्याचे निदर्शनास येताच त्यांच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी निवासी जिल्हाधिकारी डॉ शिवकुमार स्वामी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,
जिल्हा परिषद सरळसेवा महिला आरोग्यसेविका भरती सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आली. त्या परिक्षेत पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी दि. १७ जुलै २०२४ रोजी प्रत्येक जिल्हयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या गुणवत्ता यादी मध्ये सर्व महाराष्ट्र परिचर्या परिषदे मध्ये नोंदणीकृत परिचारीका म्हणजेच आर ए एन एम, आर जी एन एम, बी एस सी नर्सिंग यांचा समावेश आहे. या पैकी अनेकांची नावे ही मेरीट यादित आहेत. या भरतीत ए एन एम साहयकारी प्रसावीका, जी एन एम सामान्य प्रसावीका, बी एस सी नर्सिंग या उच्चशिक्षित प्रसाविका, या सर्व महाराष्ट्र परिचर्या परिषदे मध्ये नोंदणीकृत परिचारीका आहेत. जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग यांच्या शिक्षणामध्ये सहाय्यक प्रसावीका (ए एन एम) यांचा अभ्यासक्रम असुन त्यांनी देखील २०२३-२४ मध्ये झालेल्या पेपरसाठी अर्ज केला होता. त्यांच्या पैकी काही मेरीटमध्ये उत्तीर्ण झाल्या. मात्र संपुर्ण प्रक्रिया मध्ये त्यांना वगळण्यात येईल; असे कुठेही सुचित केले नव्हते.
त्यामुळे या सर्व पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींना आरोग्य सेविका पदावर नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी या सर्वांनी केली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 35
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.