श्याम माध्य.व उच्च माध्य.कला व विज्ञान महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
प्राचार्या.श्री. जयश्री ईप्पर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
केज । प्रतिनिधी
वडमाऊली विद्याप्रसारक मंडळ संचलित श्याम माध्य.व उच्च माध्य.कला व विज्ञान महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या बाबत वृत्त असे
केज तालुक्यातील दहिफळ (वड ) येथील श्याम माध्य.व उच्च माध्य.कला व विज्ञान महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या.श्री. जयश्री ईप्पर मॅडम या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच इंजि. शरद (बप्पा ) गदळे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून ध्वजारोहण प्राचार्या.श्री. जयश्री ईप्पर मॅडम यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्याचा सत्काराच्या कार्यक्रमानंतर शालेय तथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अध्यक्षीय समारोपात स्वातंत्र्य दिनाचे महत्व व त्यासाठी दिलेले योगदान या विषयाने अध्यक्षीय समारोप झाला. सदरील कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डोईफोडे सर यांनी केले तर आभार उपप्राचार्य गंदगे आर.व्ही.यांनी केले.
सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील सोळंके पी.एस., गपाट एम.टी, गायकवाड एम.जी.,.राऊत टी. एम., मुंडे बी. एम., भालेराव डी.ए., कुटे व्ही. व्ही., सिरसाट एम. एस., खेडकर एच. बीं.,मुंडे एस. पी.,खाडे ए. एस.,कदम मॅडम,मेहेत्रे मॅडम ,नागरगोजे आर. आदि शिक्षक ,कनिष्ठ प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा आजी-माजी विद्यार्थी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
