शारदा इंग्लिश स्कुल, कळंब शाखेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न-
रमेशराव आडसकर
कळंब-
कळंब तालुक्यातील विद्यार्थ्यांना सीबीएससी पॅटर्नचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शारदा इंग्लिश स्कूल ची उभारणी करण्यात आली असून. यापुढे नवीन इमारतीत ही शाळा भरणार आहे.
यापुर्वी कळंब वरून केजला विद्यार्थी मोठ्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी येत होते. परंतू आता कळंब येथे आठवी पर्यंत सीबीएससी माध्यमातून शिक्षण दिले जाणार असून नवीन इमारतीचे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले . सर्व उपस्थित मान्यवर, पालक,,शिक्षक वृंद यांचे विशेष आभार रमेशराव आडसकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून मानले.
यावेळी हभप बोराडे महाराज,
प्रकाश महाराज बोधले,
अंकुशराव इंगळे, हारूनभाई इनामदार, युवराज दादा काळे, प्रताप काका सोळंके, ऋषीकेश भैय्या आडसकर, डॉ. जाधवर साहेब, प्रताप मोरे सर, माजलगावचे तिडके साहेब यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती.
तसेच अर्चनाताई रमेशराव आडसकर व रंजीत दादा आडसकर यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे विशेष नियोजन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आडसकर कुटुंबाचे राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून स्वर्गीय आडसकर तात्या यांच्या विचारांची नाळ धरून आडसकर कुटुंब वाटचाल करीत असल्याने विशेष अभिनंदन केले.
या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिश्रा सर तर आभार प्रदर्शन पि. ए एम देशमुख सर यांनी केले.छत्रपती शिवाजी संस्थेचे वरीष्ठ क्लार्क बर्डे सर व लामतुरे सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
