केज तालुक्यातील शेतकरी सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षणासाठी रवाना
फार्मर कप प्रशिक्षण शेती उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी आवश्यक–
तहसीलदार अभिजित जगताप
केज दि ९(प्रतिनिधी)
पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षणासाठी केज तालुक्यातील शेतकरी शनिवार रोजी तीन दिवशीय प्रशिक्षणासाठी बीड तालुक्यातील आर्वी येथे रवाना झाले.
तहसीलदार अभिजित जगताप, पर्यावरण मित्र डॉ हनुमंत सौदागर, मराठी पत्रकार परिषद केज ता. अध्यक्ष विजय आरकडे आदींनी प्रशिक्षणार्थींचे स्वागत करून हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा देऊन रवाना केले.
यावेळी तहसीलदार अभिजित जगताप म्हणाले प्रशिक्षण घेऊन आपली शेती समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ हनुमंत सौदागर म्हणाले, प्रयोगशील शेतीसाठी महिला पुढाकार घेत आहेत. शेतीमाती समृद्ध करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
प्रशिक्षणार्थी नियोजनासाठी तालुका समन्वयक हरिश्चंद्र पांचाळ यांनी प्रयत्न केले .
