चिंचोली माळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेच्या वतीने बचत गटांना आर्थिक सहाय्य
केज-
जागतिक महिलादिन 8 मार्च 2024 निमित्त महाराष्ट्र ग्रामीण बँक चिंचोली माळी तर्फे महिला बचत गटांना आज रोजी नऊ गटांना 14 लाख वीस हजार वाटप करण्यात आले तसेच आर्थिक वर्ष 2023 24 मध्ये एकूण 24 गटांना 37 लाख 88 हजार रूपये वाटप करण्यात आले.
यावेळी शाखा व्यवस्थापक सुनील जोशी, शाखेचे ऑफिसर मयूर कदम, लिपिक अजय गवळी, संदेश वाहक नितीन थोरात, बँक मित्र अशोक गव्हाणे, किरण थोरात सर्व गटांच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
