चिंचोली माळीची भूमीगत नाली मुंबईच्या विधासभेत पर्यंत पोहोचली !
आमदार ताईंनी प्रत्यक्ष पाहणी करावी, बोगस काम असेल तर शंभर रूपयांचे बक्षीस एका स्थानिक युवकाने केले जाहीर
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील भूमिगत नाली बांधकामाची तक्रार होताच मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या प्रश्नी विधान सभेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
केज तालुक्यातील चिंचोली माळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. रोहिणी देशमुख या तालुक्यातील एका भाजपचे जेष्ठ नेते गटाच्या आहेत. सरपंच सौ. रोहिणी सुनील देशमुख यांनी प्रभाग क्र. एक मध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून भूमिगत नालीचे बांधकाम केले आहे. मात्र या भूमिगत गटाराचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केल्यामुळे आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांनी त्यांच्या पत्राद्वारे दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे केली होती.
दरम्यान विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहारात आमदार नमिता मुंदडा यांनी तारांकित प्रश्न क्र. ७८६९४ द्वारे चिंचोली माळी ग्रामपंचायतीने केलेल्या भूमिगत नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जाच्या कामा बाबत प्रश्न उपस्थित करून चिंचोली माळी ग्रामपंचायतीच्या कामाची विधासभेत चर्चा केली.
दरम्यान सामाजिक युवा कार्यकर्ते रोहन गलांडे यांनी थेट आमदार ताईंना गावात येऊन नाली कामाची पाहणी करावी, बोगस आढळल्यास शंभर रुपये रोख बक्षिस जाहीर केले आहे.