केज येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी
केज दि २३(प्रतिनिधी)
केज शहरात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती
शहरातील क्रांतीनगर भागात
साजरी करण्यात आली. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी गाडगेबाबांच्या विचाराचा जागर करण्यात आला.
विज्ञानवादी विचाराचे गाडगेबाबा यांनी आयुष्यभर समाजसेवा केली. शिक्षणाचे महत्त्व लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून पटवून दिले.स्वतः हातात खराटा घेऊन गावोगावी जाऊन सार्वजनिक ठिकाणावरील घाण स्वच्छ करण्याचे काम गाडगेबाबांनी केले. अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा यावर प्रहार केला.
उपेक्षित वंचित घटकांना प्रवाहात येण्यासाठी प्रबोधन करून प्रत्यक्ष कृतिशील कार्य केले.थोर समाजसुधारकांचे विचार कृतीत आले पाहिजेत असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास महिला नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले, नासेर मुंडे, अंजान साहेब, पत्रकार, चंद्रकांत पाटील इत्यादी उपस्थित होते.
