केज-बीड रोडवर पोलीसांचा चोख बंदोबस्त
व्हीआयपी वाहनांचा ताफा दाखल
नेमका काय आहे प्रकार
केज-
केज बीड रोडवरील लक्ष्मीनगर जवळ सकाळपासूनच बीड व केज पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहनांना लवकर निघण्याची सुचणा दिल्या जात होत्या. काय आहे, कोण येणार हे मात्र कळत नव्हते, तेवढ्यात झेड सुरक्षा असलेल्या ताफ्यात व्हीआयपी वाहणाचा ताफा दाखल झाला. त्यानंतर चौकशी केली असता समजले की, सर संघचालक (आर एस एस)
श्री.मोहनजी भागवत हे, केज येथे वास्तव्यास असणारे वाघमारे, प्रांत अध्यक्ष, आर एस एस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट म्हणून थांबले आहेत. ते चहापान व भोजन करून पुढे लातूर साठी प्रस्थान करणार आहेत. केज येथील स्वंयसेवक यांनी त्यांना भेटण्यासाठी विशेष पासची व्यवस्था केली आहे.
