Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*केजमध्ये खळबजनक प्रकार* *आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर जमावाचा हल्ला !* *लोखंडी रॉड आणि दगडाने गाडीच्या काचा फोडून पोलिसांना मारहाण !*

By February 17, 2024No Comments3 Mins Read

*केजमध्ये खळबजनक प्रकार*

*आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर जमावाचा हल्ला !*

*लोखंडी रॉड आणि दगडाने गाडीच्या काचा फोडून पोलिसांना मारहाण !*

गौतम बचुटे/केज :- फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस घेऊन जात असताना त्यांच्या वाहनाचा जमावाने पाठलाग करून वाहन अडवून दगड व लोखंडी रॉडने हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या आणि आतील पोलीस कर्मचाऱ्यांना भर चौकात मारहाण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार केज येथील छत्रपती शिवाजी चौकात घडला आहे.

या बाबतची माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बेल्हेकर आणि त्यांचे सहकारी पोलिस हवालदार प्रविण इंगळे, पोलिस शिपाई कुलदिप घोळवे हे स्कार्पिओ या वाहनाने वाहन क्र. (एम एच १६/ सी व्ही ५५५५) केज येथे आले. त्यांनी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांना सोबत घेऊन एका जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला आरोपी प्रतिक भैरवनाथ चाळक यास तपासकामी ताब्यात घेण्यासाठी लव्हूरी येथे गेले होते. त्या वेळी प्रतिक चाळक आणि त्याचे सोबतचे इतर साथीदार हे एका गाडी च्या बॉनेटवर केक ठेवून कुणाचा तरी वाढदिवस साजरा करीत होते. त्या नंतर दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २:०० वा. च्या सुमारास जामखेड पोलीस हे त्यांच्या खाजगी वाहनाने आरोपी प्रतीक चाळक यास घेऊन निघाले असता २० ते २५ जणांनी स्कॉर्पिओ गाडीने क्र. (एम एच-४४/झेड-२३००) यांनी पाठलाग केला. पाठलाग करणारानी केज येथील शिवाजी चौकात गाडी आडवी लावून पोलिसांना अडविले. त्या नंतर जमावातील एकाने हातातील लोखंडी रॉड व दगड पोलिसांच्या गाडीवर मारून काचा फोडल्या आणि आतील पोलीस हवालदार प्रवीण इंगळे यांचे गचुरे धरून मारहाण केली. पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बेल्हेकर यांना चापटाने मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी प्रतिक चाळक यास बाहेर ओढण्याचा प्रयत्न करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस शिपाई कुलदीप घोळवे यांना देखील चापटाने मारहाण करुन त्यांच्या गाडीचा खाजगी चालक विशाल कांबळे याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने शिताफीने त्यांची गाडी पुढे घेवुन ती केज पोलीस ठाणेचे गेट मधुन आतमध्ये घेवुन गेला.
त्या नतंर पोलीस हवालदार बेल्हेकर यांच्या फिर्यादी वरुन दि. १६ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात अभिषेक सावंत, ईश्वर चाळक, राहुल चाळक, सौरभ चाळक, रोहीत चाळक, मुन्ना बचाटे सर्व रा. ल व्हूरी ता. केज व अनोळखी तीन इसम अशा नऊ जणांविरुद्ध गु.र.नं. ७९/२०२४ भा.दं.वि. १४३, १४७, १४८, १४९, ३५३, २२५, ३४१, ३३२,३२३ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

———————————————–

*भरदुपारी रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या चौकात पोलिसांच्या गाडी अडवून हल्ला करून पोलिसांना मारहाण केल्याची चर्चा असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा सुरू आहे.*
————————————————-

*काय आहे प्रकरण ? :-*
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील अजहर खाजुद्दीन शेख रा. आणि शहानवाज सय्यद यांची लव्हूरी ता. केज येथील सुशांत पुरुषोत्तम चाळक आणि प्रतिक भैरवनाथ चाळक दोघानी त्यांना शेअर मार्केट मध्ये पैसे मिळवुन देण्याचे आमिष दाखवून दि. २० ऑगस्ट २०२३ ते दि. ५ डिसेंबर २०२३ या कालावधीत त्यांनी वेळोवेळी त्या दोघांकडून फोन-पे आणि आरटीजीएसद्वारे रक्कम घेवुन त्यांची १२ लाख ९० हजार रु. ची फसवणुक केली आहे. त्या प्रकरणी अजहर खाजुद्दीन शेख यांच्या तक्रारी वरून जामखेड पोलीस ठाण्यात सुशांत पुरुषोत्तम चाळक आणि प्रतिक भैरवनाथ चाळक या दोघांच्या विरुद्ध गु. र. नं. १५/२०२४ भा. दं. वि. ४२०, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्या प्रकरणी तपास करून आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
—————————————————

Post Views: 35

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 9
Total Users : 146029
Views Today :

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.