निखिल वागळे हल्ला प्रकरणी केज येथे पत्रकारांकडून निषेध व्यक्त करून कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी
केज-
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील झालेल्या हल्ला विरोधी निषेध व्यक्त करून संबधितावर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसील कार्यालय व केज- पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषद केज तालुका , व्हाईस ऑफ मिडीया केज तालुका, मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडिया, मराठी पत्रकार परिषद हल्ला विरोधी क्रती समीती व समन्वयक समिती , पदाधिकारी तसेच सर्व संघातील पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती.
