“वऱ्हाड निघालयं लंडनला”, या एकपात्री नाट्यप्रयोगात ओजस कुलकर्णी या बालकलाकाराच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
माजलगाव:-
अखिल भारतीय शंभरावे मराठी नाट्यसंमेलन तर्फे विभागीय नाट्यसंमेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे दि.1 व 2 फेब्रुवारी 2024 रोजी विविध कलावंतांच्या कलागुण दर्शनाने साजरा झाला.
या मध्ये दि.1फेब्रुवारी 2024 रोजी स्वर्गीय प्रा.डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांची अजरामर कलाकृती, “वऱ्हाड निघालयं लंडनला”, या एकपात्री नाटकातील कांही प्रसंगाचे सादरीकरण, सिंधफना पब्लिक स्कुल माजलगाव येथे इ.7वी त शिकत असलेल्या चि.ओजस अनिल कुलकर्णी(नागडगावकर) याने या ठिकाणी केले.
या त्याच्या सादरीकरणाला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी अतिशय उस्फूर्त प्रतिसाद दिला, एकपात्री अभिनयाचे कौशल्य दाखवत, ओजस ने उपस्थितांची मने जिकुंन घेतली. ओजस हा जि.प.शिक्षक अनिल कुलकर्णी यांचा मुलगा आहे,
मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले.
