


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे देशात सर्वांना समान संधी आणि न्याय..
— पोलिस उपनिरिक्षक राजेश पाटील
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खर्या अर्थाने मूकनायक ठरले- प्रा. हनुमंत भोसले
केज येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मूकनायक दिन साजरा
गौतम बचुटे-
केज येथे मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार वतीने मूकनायक दिन साजरा करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, केज येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले होते. त्या निमित्त केज येथील सर्व पत्रकार संघ व पत्रकार बांधवांनी मराठी पत्रकार पतिषदेच्या वतीने आयोजित केज येथील शासकीय विश्रामगृह येथे मूकनायक दिन साजरा केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे होते. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, मराठी पत्रकार परिषदेचे विजयराज आरकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी बोलताना पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेमुळेच देशातील सर्व नागरिकांना समान संधी प्राप्त झालेली असून त्यांनी त्यांच्या मूकनायक या पाक्षीकातून उपेक्षितांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्या काळात वृत्तपत्र सुरू करणे आणि चालविणे खूप अवघड काम असतानाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ते पेलले, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याव राज्यघटनेमुळेच देश एकसंघ असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. हनुमंत भोसले यांनी सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खर्या अर्थाने मूकनायक ठरले असून त्यांच्या विचारांना आज सर्व जण नमन करत आहेत. ते दूरदृष्टी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे ता. अध्यक्ष विजयराज आरकडे, संपादक अजय भांगे व गौतम बचुटे यांनी मूकनायक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अशोक सोनवणे, धनंजय कुलकर्णी, रमेश गुळभिले, सुहास चिद्रवार, शेख इकबाल, संतोष गालफाडे, महादेव गायकवाड, संपादक बाबा मस्के, श्रीराम तांदळे, अजिम इनामदार, बाळासाहेब जाधव, ज्योतिकांत कलसकर, अक्षय गिते यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय भांगे यांनी तर सुत्रसंचलन व आभार गौतम बचुटे यांनी व्यक्त केले.
