व्यापारी व टपरी धारक संघाचे अध्यक्ष म्हणून सय्यद माजीद,उपाध्यक्ष विठ्ठल सत्वधर, सचिव शेख शपीक,यांची बिनविरोध निवड…


केज-
केज शहरातील लहान व्यापारी व टपरीधारक संघाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना पर्यय जागेसाठी लढा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून सय्यद माजीद उपाध्यक्ष विठ्ठल सत्वधर तसेच सचिव म्हणून शेख शपीक यांची बिनविरोध एक मताने निवड करण्यात आली.
लहान व्यापारी व टपरीधारक संघातील व्यापाऱ्यांना व्यवसायसाठी शहरात हक्काची कोनतीही जागा उपलब्ध नाही या पर्याय जागेसाठी लहान व्यापाऱ्यांनी गेल्या तीस ते चाळीस वर्षी पासुन विविध अंदोलने करुनही आज पर्यत पर्यय जागा मिळाली नाही म्हणून जुने सर्व संघटना पुर्ण पने संपुष्टात आले आहेत नुतन नविन कार्यकर्णीची एकमताने निवड करण्यात आली तसेच या संघात सहसचिव म्हणून अनिल लोखंडे,कोषाध्यक्ष मुज्जफर खतिब.सदस्य म्हणून रईस मोमिन,विशाल क्षीरसागर, कुरेशी बिलाल,आसिफ तांबोळी, शकिल कादरी, आशाबाई चाटे हे सर्व सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली तसेच ज्या लहान व्यापारी व टपरीधारक यांना या संघटनेत सहभागी व्हायचे असेल तर संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क कराव असे आव्हान करण्यात आले.
