पोस्ट कार्यालयातील आधार केंद्राचा लाभ घ्यावा —- पोस्ट मास्टर पी आर पाटील
केज –
शहरातील पोस्ट कार्यालयात आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र गेल्या पाच दिवसांपासून सुरू झाले.यामुळे नागरिकांची सोय झाली आहे.
सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच शुल्क घेऊन काम केले जाते.या आधार सेवा केंद्रामध्ये नवीन आधार नोंदणी, आधार दुरुस्ती , आधार अद्यावत ही सेवा दिली जाणार आहे. सुट्टीचे दिवस वगळून हे आधार केंद्र सुरू राहणार आहे .नव्याने सुरू झालेल्या आधार केंद्रातून मिळणाऱ्या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पोस्ट मास्तर पी.आर .पाटील यांनी केले आहे.