Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

सावधान .. स्वस्त धान्य दुकानातुन प्लास्टिक सदृश्य तांदळाचे वितरण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By December 13, 2023No Comments2 Mins Read

सावधान .. स्वस्त धान्य दुकानातुन प्लास्टिक सदृश्य तांदळाचे वितरण

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

नेकनूर–मनोज गव्हाणे

स्वस्त धान्य दुकानातून वितरित होत असलेल्या तांदळामध्ये हुबेहूब प्लास्टिक सदृश्य तांदूळ असल्याचे दिसून येत असून हा तांदळाचा आकार विशिष्ट असून एकसारखा पाहायला मिळतो. पाण्यामध्ये तो तरंगताना आढळत असल्याने तो प्लास्टिकचा असल्याचे शिक्कामोर्तब होत असून नागरिकांचे आरोग्य शासनाच्या वितरण व्यवस्थेकडूनच धोक्यात आणले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूरमधील स्वस्त धान्य दुकानातून मागच्या महिन्यात वितरित झालेल्या तांदळामध्ये वेगळेपण काहीच्या निदर्शनास आले त्यांना या तांदळामध्ये काहीतरी वेगळेच शिजत असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे बारकाईने या तांदळाकडे पाहून शोध घेतला असता मिसळ असलेला तांदूळ विशिष्ट आकाराचा एकसारखा शिवाय कलर मध्ये गडद पांढरेपणा जाणवला. स्वच्छ करण्यासाठी फटकरताना हा मिसळीचा तांदूळ अलगद बाहेर फेकला गेला . नंतर पाण्यामध्येही तो तरंगला यामुळे हा तांदूळ वेगळाच असून तो प्लास्टिक असल्याचे काही सुज्ञ नागरिकांनी हेरले . राशनमधून दिला जाणारा हा तांदूळ अनेकांना मोफत मिळत असल्याने याकडे कोणाचे पाहिजे तेवढ्या प्रमाणात बारकाईने लक्ष जात नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी शासनाच्या व्यवस्थेकडूनच खेळ चालवला गेल्याचे यामुळे स्पष्ट होत असून पोटाचे, पचन संस्थेचे आजार यामुळे बळवण्याची शक्यता अधिक आहे.
मात्र महसूल प्रशासनाकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्याप स्पष्ट झालेली नाही. अधिक तपासानंतरच यातील सत्य बाहेर येणार आहे.
—//———-/—————–स्वस्त धान्य दुकानातून मिळालेल्या तांदळात काहीसे वेगळेपण जाणवले बारकाईने पाहिल्यानंतर यामध्ये विशिष्ट प्रकारचा एकसारखा बनवलेला तांदूळ दिसला तोंडात तो चावत नाही दबला जातो यामुळे तो प्लास्टिकचा असल्याचे जाणवते , पाण्यावर तो तरंगत असल्याने संशय वाढला —मेघराज काळे,नागरिक नेकनूर- —————————- अशा प्रकारे भेसळ असेल तर आरोग्यासाठी हानिकारक आहे यामुळे पोटाचे विकार बळावतील पचनक्रियेला बाधा होईल नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे—- डॉ. के.बी. पैठणकर , सर्जन,पोट विकार तज्ञ

Post Views: 31

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 9
Total Users : 146029
Views Today : 41

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.