वसंत फार्मसी कॉलेज च्या वतीने एड्स जनजागृती रॅली संपन्न .
केज-

दि.01डिसेंबर 23
छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलीत वसंत फार्मसी कॉलेज केज,शासकीय ग्रामीण रुग्णालय केज व ग्रामीण विकास मंडळ यांच्या संयुक्त विध्यमाने “जागतिक एड्स दिनानिमीत्त ” केज शहरामध्ये एड्स जनजागृति रॅली चे आयोजन करण्यात आले होते.या रॅली चे उद्घाटन संस्थेचे प्रशासकिय अधिकारी मा.रंजित दादा आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शासकीय ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.केंद्रे सर,प्राचार्य श्री थळकरी सर,डॉ.मुंडे सर सामाजिक कार्येकर्ते श्री.भोसले सर,समुपदेशक सौ.साकसमुद्रे म्याडम ,प्रा.महादेव लांडगे सर,श्री.नागरगोजे सर,फारोखी टी.एम.,शेख सलीम,सोनवणे वनमाला ,प्रा.जाधव सर,अंजली कोकणे,प्रा.राम चौरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या रॅली ची सुरुवात वसंत फार्मसी कॉलेज पासुन करण्यात आली तसेच कानडी चौक मार्गे बसस्थानका पासुन तहसिल कार्यालय केज येथे समारोप करण्यात आला या समारोपा मध्ये तहसिलदार मा.जगताप साहेब यांनी मार्गदर्शन केले या रॅली मध्ये दोन्ही वर्षाचे विध्यार्थी मोठ्या संखेने उपस्थीत होते,या वेळी जोशपुर्ण घोषणाने शहर दणानुन गेले होते,विध्यार्थीच्या हाता मधे जनजागृती विषयी वेग वेगळे फलक दिसत होते ही रॅली यशस्वी करण्या साठी श्री.राऊत सर,श्री.सावरे सर,श्री.पतंगे सर,शेख सना,सद्दाम शेख,मोहसीन शेख श्री.भाकरे,शेख योम्मोद्दीन आदिनी परिश्रम घेतले.
