बोरी सावरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभे निमित्त १०० एकर जागेचे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न;
केेज;प्रतीनीधी
तालुक्यातील बोरीसावरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणा निमित्त महासभेचे आयोजन दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले असून त्या अनुषंगाने त्या निमित्त बोरी सावरगाव ते बनसारोळा रस्त्यालगत 100 एकर जागेचे नियोजन करण्यात आले त्या जागेचे शेतातील उभे पीक नष्ट करून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जागा उपलब्ध करून दिली त्यानिमित्त त्या शेतकरी बांधवांचे उपस्थित सकल मराठा समाज बांधवाकडुन कौतुक होत आहे. या सभेचे आयोजनानिमित्त भूमिपूजन कार्यक्रम आज संपन्न झाला या साठी
केज तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या सभेसाठी महिलांची वेगळी सोय करण्यात आली असून या सभेला तालुक्यातील महिला व पुरुष, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजितांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी केज तालुक्यातील प्रत्येक आयोजित सभेच्या जागेच्या भूमीपूजनासाठी गावातील सकल मराठा बांधव, सकल मराठा समाज प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
चौकट:-मनोज जरांगे पाटील यांची सभा आमच्या शेतात घेने हे आम्ही आमचे भाग्य समजतो ,त्यांच्या पदस्पर्शाने आमची जमीन पावन होणार आहे, तालुक्यातील सर्व जनतेने या सभेसाठी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे.
शेतकरी
हणुमंत मुळे, चंद्रकांत मुळे, धनराज मुळे,
