मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त केज येथे पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
केज-
मराठी पत्रकार परिषदेचा ३ डिसेंबर रोजी ८५ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते. याहीवर्षी परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख सर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील जवळपास १०,००० पत्रकारांची राज्यभरातून एकाच दिवशी आरोग्य तपासणी करण्याचा विक्रम आपण करणार आहेत.
केज येथेही दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. हे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. तसे पत्र उपजिल्हा रूग्णाल केज येथील वैद्यकीय अधिक्षक, डॉ. केंद्रे यांना दिले आहे.
परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, जितेंद्र सिरसट, उपाध्यक्ष गौतम बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषद केज तालुका अध्यक्ष विजय आरकडे, डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष रामदास तपसे, तालुका समन्वयक व निमंत्रक सुहास चिद्रवार, दशरथ चवरे व तालुक्यातील सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष हे पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आरोग्य तपासणी शिबीराला केज तालुक्यातील शहरी, ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषद केज च्या वतीने करण्यात आले आहे.
