बीड, माजलगाव जाळपोळ प्रकरणी मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
बीड-
जिल्ह्यात मराठा आरक्षण प्रकरणी उग्र रूप धारण केले आहे. माजलगाव, बीड शहरात तोडफोड व जाळपोळीच्या हिंसक घटना घडल्या आहेत. याप्रकरणी मराठा आरक्षण संबधी उपोषणाला बसलेले समाजाचे नायक मनोज जरांगे यांनी शांततेचे आवाहन केले आहे. या अशा घटना कामावर आल्यावर मला त्रास होतो. आपले आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवा, आपले ठरल्याप्रमाणे पुढार् यांना आपल्या दारात उभे करायचे नाही, आपण त्यांच्या घरावर आणि त्यांच्यावर हल्ले करून समाजातील गोरगरीब नागरिकांना त्रास होईल असे वागू नका असे आवाहन केले आहे.
———————————-
दंगे करणारे कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाचे असल्याचा शंशय-
असे , दंगे करून आंदोलनात गालबोट लावून आंदोलन मोडीत काढण्याचा शंशय असून या प्रकरणी मी तपास करण्यासाठी सांगणार आहे. असेही मनोज जरांगे यांनी वृत्त वाहिनीवर मुलाखतीत सांगितले आहे.
