केज येथे रविवारी बहुजन विकास परिषदेचा संकल्प मेळावा !
रमेशतात्या गालफाडे यांची पत्रकार परिषदेत माहीती
केज/प्रतिनिधी
बहुजन विकास परिषदेच्या वतीने संकल्प मेळाव्याचे आयोजन रविवारी (दि.२९) ऑक्टोंबर २०२३रोजी सकाळी ११ वाजता केज शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेशतात्या गालफाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेळाव्याचे उदघाटन येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांच्या हस्ते होणार असून मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे माजी जि. प. सदस्य बाळासाहेब सिरसाट हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष शिंदे डॉ. योगेश क्षीरसागर, जि. प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित हे उपस्थित राहणार असून मेळाव्याच्या स्वागताध्यक्ष म्हणून शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड हे राहणार आहेत. मेळाव्याला जेष्ठ नेते सूर्यकांत भालेराव, शंकर तडाके, नगरसेवक डॉ. भारत वैरागे, महादेव गालफाडे, सुदाम घुगे, डॉ. साबाळकर, दिलीप तेलंग, अशोक साठे, निलेश सरवदे, नारायण वैराळ, राहावे मारुती वाडेकर, निवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद गालफाडे, गजानन पगारे, अर्जुन गालफाडे, . अदिती निटूरे, राजू थोरात, सागर गायकवाड, रामभाऊ आवाड, चंद्रकांत ठोंबरे, सरपंच कैलास पाटील, जालिंदर जाधव, शिवाजी अहिरे, रामेश्वर चांदणे, कैलास वाकळे, पंचशीला थोरात, अशोक सोनवणे, बापूसाहेब कसबे, प्रकाश बोरखे, अमोल आल्हाट, बालू आठवले, रामभाऊ गायकवाड, कृष्णा पांडव, मनोज ससाणे, केद सिरसाट, रवींद्र सिरसाट, विजय क्षीरसागर, महादेव लांडगे, गणेश , बाबा गायकवाड, विजय शिंदे, मनोहर कसबे, बाबा कांबळे, उद्धव , जगन्नाथ आव्हाड, ओंकार , दिनकर घुगे, भागवत वैद्य, नानासाहेब, वाल्हेकर, प्रा. बबन गायकवाड, अशोक ढास, जितेंद्र गालफाडे, बापू मरसाळे, प्रदीप चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यास बहुजन समाज बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित असे संयोजक तथा परिषदेचे समन्वयक रमेश पाटोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
