अनुप्रवर्तन दिन म्हणजे मानव मुक्तीचा सोहळा
केज-
केज शहरातील भीम नगर येथे वेळूवन बुद्ध विहारामध्ये अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षवास निमित्त विहारांमध्ये ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन सुरू आहे.या निमित्ताने अनेक बौद्ध उपासक उपसिका नियमितपणे बुद्ध विहारात उपस्थित असतात.यामुळे धम्म विचारांची देवाण-घेवाण होऊन अनेकांपर्यंत धम्मविचार पोहोचत आहे. आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधत सर्व बौद्ध उपासक, उपासिका ,बालक, बालिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून विहारांमध्ये उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मस्के यांच्या अध्यक्षतेखाली तर बीड जिल्हा पूर्वचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रा.एस. बी. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मान्यवरांनी अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष डॉ.प्रभाकर ठोके, कोषाध्यक्ष शिवकुमार मस्के, संस्कार सचिव चंद्रकांत मस्के, कार्यालयीन सचिव सुनिता कांबळे, कुसुम मस्के यांसह विलास मस्के, सुभाष हजारे ,कल्याण मस्के ,सुरेखा मस्के ,विजयमाला हजारे, रत्नमाला मस्के ,लक्ष्मीबाई मस्के व इतर बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे शहर सरचिटणीस मस्के जे. आर.यांनी केले सरणत्त घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
