संस्कृती सेवाभावी संस्था केज व कैलास सत्यार्थी फाउंडेशन दिल्लीच्या वतीने बालविवाह प्रतिबंधक कायद्याची विद्यार्थ्यांना दिली माहिती
केज. ढाकेफळ येथे 16 ऑगस्ट ऑगस्ट बालविवाह मुक्तदिना निमित्त उच्च प्राथमिक शाळा जिल्हा परिषद येथे बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती व बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम संस्कृती सेवाभावी संस्था केज व कैलास सत्यार्थी फाउंडेशन दिल्ली अंतर्गत घेण्यात आला.
संस्कृती सेवाभावी संस्थेच्या विजया कांबळे यांनी बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून पालक मुलांच्या मनाविरुद्ध लहान वयातच लग्न लावली जातात त्यामुळे मुलींचा जगण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे अशी लग्न होत असेल तर 1098 या क्रमांकावर माहिती देऊन थांबवायची आहेत व बीड जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करायचा आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोराळे मॅडम व शाळेचे तरकसबंध सर यांनीही मुलांना बालविवाह कायद्याची माहिती दिली यावेळी मीरा घोरपडे व कदम मॅडम इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी मुलांनी बालविवाहाच्या विरुद्ध घोषणा देऊन कार्यक्रमाचे समारोप केला
