केज तालुक्यात सोयाबीनच्या उभ्या पिकाला व हिरव्या शेंगाला फुटले कोंब !
आधी पावसाने गेलं अन् जे त्यातुन आलं ते
सुद्धा निसर्ग हिरावून नेण्याचा मार्गावर !
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील चार ते पाच दिवसा पासून सतत पाऊस पडत असल्याने काढलेला सोयाबीन फुटलेले असल्याने; जे आलं ते सुद्धा आता जाण्याच्या मार्गावर आहे.
केज तालुक्यातील साळेगांव येथील अक्षय वरपे या तरुण शेतकऱ्याने शेतात पेरलेले २२८ बुस्टर या वाणाचे सोयाबीन आता काढणीला आलेले असताना; मागील चार ते पाच दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने अक्षय वरपे यांच्या शेतातील उभ्या पिकाला कोंब फुटलेले आहेत. त्यात विशेष हे की, वाळलेल्या शेंगाला कोंब फुटणे हे विशेष नाही; परंतु ओल्या आणि हिरव्या व कच्च्या शेंगाला कोंब फुटले असल्याने हे आश्चर्य आहे. या मुळे या तरुण शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.
आधी पावसा वाचून नुकसान अन आता जे आलं ते सुद्धा जाण्याचा मार्गावर :- पिकं फुलांच्या बहरात असताना आणि कोवळ्या शेंगा असताना तब्बल एक महिन्या पेक्षा जास्त काळ कोरडा होता आणि त्या नंतर आता जे पीक कसं तरी आलं ते सुद्धा आता जाण्याच्या मार्गावर आहे.
