पंकज कुमावत यांनी सहकारी कर्मचारी यांच्या सोबत परिसराची केली स्वच्छता
गौतम बचुटे/केज :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा निमित्ताने केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या परीसरात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.
२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्त देशात सेवा सप्ताह राबविण्यात येत असून त्या निमित्त स्वछता मोहीम सुरू आहे. १ ऑक्टोबर रोजी केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, पोलीस उपनिरीक्षक बप्पा कुलकर्णी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद ढाकणे, शेषेराव यादव, पोलीस कर्मचारी विकास चोपणे, अनिल मंदे, दिलीप गित्ते, महिला पोलीस आशा चौरे यांनी परिसरात स्वच्छता केली.
