रिपाईच्या शिष्टमंडळाने घेतली ना. रामदास आठवले यांची भेट
गौतम बचुटे/केज :- दि. २४ सप्टेंबर रोजी केज तालुका रिपाईंच्या शिष्टमंडळाने बीड येथील शासकीय विश्राम गृहावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची भेट घेतली.
या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या सोबत युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे, ब्रह्मानंद चव्हाण, बाबुरावजी कदम हे उपस्थित होते.
या शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांच्यासह जिल्हा मराठवाडा संघटक गोवर्धनजी वाघमारे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, शहराध्यक्ष भास्कर मस्के, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, विकास आरकडे, दिलीप बनसोडे, शरद धिवार, गौतम बचुटे, प्रफुल वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी शिष्टमंडळाने केज मतदार संघातील दलितांचे विविध प्रश्न आणि आगामी निवडणुकीत केज विधानसभा मतदार संघाची जागा ही युवा रिपाइंचे नेते पप्पूजी कागदे यांना सोडण्यात यावी
रिपाइं केज विधानसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहे. अशी शिष्टमंडळाने मागणी केली.
