केज येथील अनेक पिढीला शिक्षणाचा मार्ग दाखवणारी जि.प. हायस्कूल आजपासून बंद
केज-
शहरातील सर्वात जुनी जि. प. शाळा व याच शाळेत तालुक्यातील शहरातील अनेक नामांकित विद्यार्थी शिकले व घडले ती शाळा आज अखेर विद्यार्थी पट कमी असल्याने बंद करण्याची वेळ शिक्षण विभागाला आली आहे.
या शाळेत शिकलेली कित्येक विद्यार्थी हे आज विविध ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत. तर येथून अनेक खेळाडू निर्माण झाली व ते आपापल्या क्षेत्रात चमकले. ते याच शाळेत शिकून. मागील काही वर्षापासून विद्यार्थी पट सातत्याने कमी होत आहे. आज घडीला फक्त 28 विद्यार्थी पट होता. त्यामुळे ही शाळा अखेर बंद करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
येथील शिक्षकांचे इतर जि. प. शाळेत समायोजन केले जाणार आहे.
तर विद्यार्थी यांना जवळपास असणाऱ्या शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे समजते.