गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद दुन्नब्बीच्या पार्श्वभूमीवर केजमध्ये पोलिसांचे पथसंचलन
गौतम बचुटे/केज :- गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर केज मध्ये पोलिसांनी शस्त्रासह शहरातून पथसंचलन केले.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद दुन्नब्बी या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून केज पोलिसांनी दि १८ सप्टेंबर रोजी। शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन केले. यात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, दंगल नियंत्रण पथक, पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान आणि विशेष प्रशिक्षण घेतलेले कमांडो हे शस्त्रासह सहभागी झाले होते.
