लक्ष्य सायन्स क्लासेस येथे शिक्षक दिन साजरा
केज-
शहरातील लक्ष्य सायन्स क्लासेस येथे विद्ध्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शिक्षक दिन साजरा केला.
५ सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती निमित्त, लक्ष्य सायन्स क्लासेस येथे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी शिक्षक सत्काराचे नियोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण देशमुख सर , विजय आरकडे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
लक्ष्य सायन्स क्लासेसचे प्रा. गालफाडे सर यांनी उपस्थित विद्यार्थीना शिक्षक दिनानिमित्त सखोल मार्गदर्शन करून गुरू शिष्य विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे प्रविण देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना काळ हाच गुरू मानून जिवनात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले .विदयार्थी. कु रंजना भांगे ची. केदार परमेश्वर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात आरकडे सर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त केलेल्या सत्काराबद्ल विद्यार्थी, व संचालक गालफाडे सर यांचे आभार मानले.
