रमेशराव आडसकर यांनी उपोशनस्थळी जाऊन जरांगे पाटील यांची घेतली भेट
जालना-
बीड जिल्ह्यातील भाजपाचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी जालना जिल्ह्यातील अंतारवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळणे काळाची गरज आहे. यासाठी आपण प्रशासकीय, शासकीय व राजकीय पदाधिकारी यांच्याकडे समाजाची भावना माडणांर असून मराठा समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहून शासनाने आरक्षण देण्याची मागणी करणार आहोत अशी भूमिका जरांगे पाटील यांना सांगितली आहे.
जरांगे पाटील यांनी आडसकर यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
