कोतवालांची परीक्षा सुरू;
वाचा,कशी आहे परिक्षा पध्दत
गौतम बचुटे/केज :-
केज
महसूल प्रशासनाच्या वतीने कोतवालांची सहा जागेसाठीची परीक्षा सुरू झाली असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
केज तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने दि. ३ सप्टेंबर रोजी कोतवाल पदाच्या सहा जागेसाठी लेखी परीक्षा सुरू झाली आहे. सहा जागेसाठी सहाशे अर्ज विक्री झाली असून सहा जागेसाठी ३९४ उमेदवार परीक्षा देत आहेत. कोतवाल पदाची परीक्षा बीड रोडवरील शारदा इंग्लिश स्कुल या परीक्षा केंद्रावर सुरू झाली आहे. त्यासाठी एकूण १७ परीक्षा दालनात परिक्षार्थीची बैठक व्यवस्था केली आहे. परीक्षा प्रमुख म्हणून तालुका शिक्षण अधिकारी आणि सहाय्यक परीक्षा प्रमुख म्हणून कृषी अधिकारी तर पर्यवेक्षक म्हणून मुख्याद्यापक व सहशिक्षक हे काम पहात आहेत.
या परीक्षेवर तहसीलदार हे देखरेख करीत असून परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
