नायब तहसीलदार आशा वाघ यांनी मूकबधिर विद्यार्थ्या सोबत साजरे केले रक्षाबंधन !
शासकीय सेवेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे दिले अभिवचन
गौतम बचुटे/केज :-
केज तहसीलच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांनी मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्या सोबत रक्षा बंधन साजरे केले.
या बाबतची माहिती अशी की, केज तहसीलच्या संजय गांधी निराधार विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. रक्षा बंधनांच्या निमित्ताने त्यांनी जनार्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मूकबधिर निवासी विद्यालय उमरी ता. केज येथील मुकबधिर विद्यार्थ्या सोबत रक्षा बंधन साजरे केले. या वेळी त्यांनाही विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. त्या प्रसंगी नायब तहसिलदार आशा वाघ यांनी भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, केज तालुक्यातील त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व मूकबधिर विद्यार्थ्यांना संजय गांधी योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदाना संदर्भात विशेष प्रयत्न करून एकही विद्यार्थी त्या पासून वंचित राहणार नाही. यासाठी स्वतः वैक्तिक लक्ष देऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला मुख्याद्यापीका श्रीमती सूर्यवंशी मॅडम, हिंगे मॅडम, पवार मॅडम, बापू शिंदे सर, नितीन शिंदे सर, शिरसाट सर ,अतुल कापरे तसेच विद्यार्थी कु. विद्या तोंडे, कू. अश्विनी तनपुरे, कू. मयुरी, कू. रेणुका शेंगर, चि. गणेश कापरे, चि.राम पवार हे उपस्थित होते.
