गावोगाव भटंकती करून समाज जागृती करणारा अवलिया खंजिरी वादक भाऊराव सोळंके;
वयोवृद्ध असुनही लोक कलावंताच्या मानधनापासून वंचित
गौतम बचुटे/केज :-
गरिबांची पोर झाले क्लेकटर आणि सजविली लेखणीने दिल्लीची राजधानी अशा शाहू फुले आंबेडकर चळवळींचे गित गात गावोगाव आणि दारोदार फिरून खंजिरी वादन करणारे भाऊराव सोळंके हे अमरावती जिल्ह्यातील ७० वर्ष वयाचे लोककलावंत भटंकती करीत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारण्यासाठी घेतलेले अपार कष्ट आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना तसेच स्वतंत्र भारताची राज्य घटना लिहून देशातील वंचित, उपेक्षित आणि स्त्रियांना हक्क मिळवून दिले. याची माहिती वाड्या-वस्ती गावखेड्या पर्यंत समाज घटकाला व्हावी म्हणून खंजिरीवर गीत गाऊन त्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य करीत असलेले अमरावती जिल्ह्यातील भानखेडा (खुर्द) ७० वर्ष वयाचे भाऊराव सोळंके हे भटंकती करीत कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत गुजराण करीत आहेत. त्यांचा दमदार आणि पहाडी आवाज आणि अत्यंत कुशलतेने तीन-तीन खंजिऱ्या वाजवून मनोरंजना बरोबरच लोकशिक्षण आणि समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत.
भाऊराव सोळंके हे कलावंताच्या मानधना पासून वंचित :- भाऊराव सोळंके यांना अद्यापही सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोककलावंत यांना दिले जाणारे मानधन या पासून असे अनेक कलाकार वंचीत आहेत.
