केज पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला आघाडीच्या वतीने रक्षा बंधन साजरे
गौतम बचुटे/केज :-
केज तालुका राष्ट्रवादी महिला आघाडी च्या वतीने केज पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षा बंधन साजरे करण्यात आले
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने केज पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या वेळी तालुका अध्यक्ष सौ. शितलताई लांडगे, उपाध्यक्षा अर्चनाताई इंगळे, सचिव राणिताई क्षीरसागर, शहराध्यक्षा सुनिताताई डबरे यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, रमेश सानप, त्रिंबक सोपणे, दत्तात्रय बिक्कड, सचिन अहंकारे, संतोष गित्ते, जाधव मॅडम, गृह रक्षक दलाचे जवान प्रकाश मस्के आणि पत्रकार गौतम बचुटे यांच्यासह उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याना राख्या बांधल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले की, संकट समयी पोलीस सर्वांच्या मदतीला धावून जातात म्हणून बहिणीचे रक्षणकर्ते हे खरे भाऊ आहेत आणि पोलीस कधीही कर्तव्या पासून ढळत नाहीत असे मत व्यक्त केले. तर रक्षा बंधनाचा सण पोलीस ठाण्यात साजरा केला त्या पाठीमागची उद्देश व्यक्त तालुका अध्यक्षा सौ. शितलताई लांडगे यांनी पोलीस बांधव हे समाजाचे खरे रक्षणकर्ते असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
