Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

२००८ साली दोन गटातील हाणामारी प्रकरणी ना. धनंजय मुंडेसह इतरांची निर्दोष मुक्तता; केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला निकाल

By August 28, 2023No Comments2 Mins Read

२००८ साली दोन गटातील हाणामारी प्रकरणी ना. धनंजय मुंडेसह इतरांची निर्दोष मुक्तता;

केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला निकाल

गौतम बचुटे/केज :- धारूर पंचायत समितीच्या सभापती निवडी वरून तेलगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी सरकार पक्षातर्फे पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात ना धनंजय मुंडे यांच्या सह इतरांची केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्या आधारे निर्दोष मुक्तता केली आहे
या बाबतची माहिती अशी की, दि. १२ मार्च २००८ रोजी धारूर पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून तेलगाव येथे दोन गटात हाणामारी झाली होती त्या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकां विरोधात फिर्याद दिली नव्हती परंतु सरकार पक्षातर्फे दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी फिर्यादी होऊन राजाभाऊ मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह २२ जणांच्या विरुद्ध गु. र. नं. २९/२०२३ भा. दं. वि. १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ३३६, ३३७ नुसार राजाभाऊ मुंडे, सतीश बबन बड़े धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड, विजय लगड, दामोदर धुमाळ, गणपत धुमाळ, महादेव गोरे, विठ्ठल गोरे, सूर्यकांत उर्फ सूर्यभान मुंडे, चंद्रकांत हरिकिशन लगड, बंडू शेतिबा जाधव, बालासाहेब धर्मजी लगड, गणेश बंडू लगड, भुजंग जाधव, चिंतामण लगड, युवराज लगड, अशोक जाधव,भास्कर उत्तम जाधव, उद्धव जाधव, संतोष लगड, लखन जाधव, अनंत पवार आणि लहू जाधव या चोवीस जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यातील गणपत धुमाळ आणि उद्धव जाधव हे मयत झाले आहेत.

त्या नंतर जिल्हा व सत्र न्यायालय माजलगाव येथे त्यांच्यावर दोषारोप दाखल करण्यात आले होते.
दरम्यान धारुर आणि केज तालुक्यातील सर्व प्रकरणे केज येथे नव्याने सुरू झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद व पुरावे याचे अवलोकन करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कुणाल जाधव यांनी सर्वांची सबळ पुराव्या आधारे निर्दोष मुक्तता केली.
आरोपींच्या वतीने ॲड. कवडे, ॲड. मुंडे, ॲड. डक यांनी काम पाहिले.

Post Views: 22

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 5
Total Users : 146025
Views Today : 37

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.