Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न रमेशराव आडसकर यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

By August 28, 2023No Comments2 Mins Read

वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

रमेशराव आडसकर यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

केज-
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस अंतर्गत वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था यांची 27 ऑगस्ट रविवार या दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेशरावजी आडसकर साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पतसंस्थेचे चेअरमन सुरेशराव शिनगारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेचे मुख्याध्यापक होते . कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक कै.बाबुरावजी आडसकर व विद्येची देवता सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शाखेच्या मुख्याध्यापकांचा तसेच नवनियुक्त संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .
वसंत शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेने यावर्षी सभासदांचे जे पाल्य एमबीबीएस प्रवेशा साठी पात्र ठरले आहेत त्यांचा शाल, श्रीफळ , पुष्पहार , पुष्पगुच्छ , 11000 रुपयाचा धनादेश तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शशांक सुरेश शिनगारे ,सुप्रिया सुनील राऊत , प्रणव प्रकाश खुळे , रोहन शिवाजी हजारे , क्षितिजा विकास देशमुख ,ऋषिकेश प्रवीण देशमुख , पवन श्रीकिशन चाटे ,श्रावणी राजेश देशमुख , विनीत रामकृष्ण शिनगारे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला .
या सत्कारानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि अहवाल वाचन पतसंस्थेचे चेअरमन सुरेशराव शिनगारे यांनी केले पतसंस्थेच्या कामकाजाबद्दल तसेच गेल्या आर्थिक वर्षातील ताळेबंद , खर्च , नफा याबाबत विस्तृत माहिती त्यांनी अहवाला मधून सभासदांना सांगितली .
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांनी पतसंस्थेची आणि सभासदांची आर्थिक प्रगती कशाप्रकारे होईल , पतसंस्थेचा सभासदांना आणि सभासदाचा पतसंस्थेला कसा फायदा होऊन आपला आर्थिक स्तर सुधारता येईल , यासाठी काही बाबी सांगितल्या तसेच ही पतसंस्था मोठी झाली तर या माध्यमातून अनेक सभासदांचे स्वप्ने साकार होतील .
या मार्गदर्शनानंतर वसंत शिक्षक व शिक्षकेतर संस्थेचे संस्थेचे सचिव बालासाहेब घुगे यांनी आभार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत विद्यालयाचे पी.पी. जाधव सर यांनी केले .
कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व सभासदांनी सुरुचि भोजनाचा स्वाद घेतला .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश शिनगारे , व्हाईस चेअरमन सुरेश कांबळे , सचिव बालासाहेब घुगे , खजिनदार दत्तात्रय यादव , संचालक शाहूराव साखरे , महादेवराव फावडे , गणेश सपाटे, सतीश नखाते ,अनिल माचवे , अनिल सावंत ,अशोक मेत्रे ,अनुजा मोगले , रोहिणी पुरी , माधव गायकवाड , डोंगरे मदन तसेच पतसंस्थेचे कर्मचारी पुरुषोत्तम साखरे यांनी परिश्रम घेतले .

Post Views: 24

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 2 5
Total Users : 146025
Views Today : 37

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.