सोनेसांगवी ग्रामपंचायतीचा स्त्रीशक्तीला प्राधान्य देणारा निर्णय ; तालुक्यातून विद्यार्थ्यांनी पहिली आल्यास मिळणार ध्वजारोहणाचा मान
केज ;
स्त्रियांना समान दर्जा मिळावा त्यांनाही प्रोत्साहन मिळावे हा उद्देश समोर ठेवत तालुक्यातील सोनेसांगवी ग्रामपंचायतने तालुक्यातून प्रथम आल्यास विद्यार्थिनीच्या हाताने ध्वजारोहण करण्याबरोबरच स्त्रीजन्माचे स्वागत त्यांच्यानावे फिक्सडिपॉजिट करून करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आल्याची माहिती सरपंच मुकुंद कणसे यांनी दिली
गावातील अनेक विषयांसंदर्भात दि 25 वार शुक्रवार रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यात विविध विकासकामांवर चर्चा झाली त्याचबरोबर स्त्रियांचा सन्मान देण्याच्या विषयावर देखील चर्चा करण्यात येऊन यापुढे गावात स्त्रीजन्माचे स्वागत करण्याचे ठरवण्यात येऊन मुलीचा जन्म झाल्यास तिच्या नावे पाच हजार पाचशे एक रुपयांचे फिक्सडिपॉजिट करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच मुलींची शिक्षणातील रुची आणखीन वाढावी त्यांच्यात स्पर्धा वाढावी याकरिता दहावी व बारावीच्या परीक्षेत गावातील मुलीचा पहिला , दुसरा अथवा तिसरा क्रमांक क् आल्यास स्वतंत्रदिनाचे ध्वजारोहण त्याच मुलीच्या हस्ते करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला
गावातील स्त्री – पुरुष भेदभावाची मानसिकता समूळ नष्ट व्हावी व स्त्रियांप्रती आदर वाढावा तसेच मुलींची राष्ट्रप्रेमातुन अभ्यासाची गोडी आणखीन वाढावी याउद्देशाने निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरपंच मुकुंद कणसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली
यावेळी उपसरपंच राहुल डिकले सदस्य शामल पांचाळ , सिध्देश्वर साखरे , कलम यादव , बबर शेख , मिनाताई राऊत , संगीता गालफाडे ग्रामसेवक वाकळे महेश यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती
