१० वीत शिकत असलेला विद्यार्थी बेपत्ता : अज्ञाता विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल
गौतम बचुटे/केज :- उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता कळंब येथे इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी शिकवणीला गेल्या पासून बेपत्ता झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता. कळंब येथील अनुज गुणवंत नाईकवाडे वय (१६ वर्षे) हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत आहे. तो दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वा शिकवणीला जातो म्हणून गेला होता. त्या नंतर तो रात्री ८:०० वा पर्यंत घरी आला नाही म्हणून त्याच्या आई वडिलांनी शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. म्हणून त्याचे वडील गुणवंत नाईकवाडे यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात अनुज नाईकवाडे याचे कोणीतरी अज्ञात कारणा वरून अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची फिर्याद दिली आहे. त्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग गोरा, उंची पाच फुट, अगांत काळया रंगाचे शर्ट व पॅन्ट, पायात चप्पल आणि उजव्या मानेवर मस असे आहे. तो कोणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
