स्व. लोकनेते बाबुरावजी आडसकर यांचे सातव्या पुण्यस्मरणा निमित्त ह.भ.प.महंत महादेव महाराज बोराडे यांच्या कीर्तनाचे आयोजन !
नागरीकांनी उपस्थीत राहावे.- रमेशराव आडसकर
केज/ प्रतिनिधी
स्व.लोकनेते बाबुराव आडसकर यांच्या सातव्या पुण्यस्मरणा निमित्त ह.भ.प.महंत महादेव महाराज बोराडे-शास्त्री, श्रीक्षेञ पावनधाम यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की,दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक १०-०० वाजता छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथे स्व. लोकनेते बाबुरावजी आडसकर यांचे सातव्या पुण्यस्मरणा निमित्त महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे-शास्त्री यांच्या कीर्तनाचे व भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरीकेज,आंबेजोगाई, धारूर,वडवणी, माजलगाव तालुक्यातील सर्व नागरिक, स्नेही, कार्यकर्ते, व स्व. लोकनेते बाबुरावजी आडसकर यांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केले आहे.
