इंग्रजीचं भांडण मराठीत गेलं……!
इंग्रजी वाचता येत नाही का ? म्हणून झाली तुंबळ मारामारी !
गौतम बचुटे/केज :- इंग्रजी वाचता येत नाही तर तुम्ही किराणा दुकानावर का बसता या क्षुल्लक कारणा वरून केज तालुक्यात दोन गटात तुंबळ मारामारी झाली आहे
या बाबतची माहिती अशी की, दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील येवता येथे एका विनोद बाळासाहेब काळे हा भारत गायकवाड यांच्या किराणा दुकानाला गेला आणि त्याने बिस्कीट व एस एम एस हा कुरकऱ्याचा पुडा मागितला. परंतु भारत गायकवाड या दुकानदाराला इंग्रजी वाचता येत नसल्याने तो ते जिन्नस नाही म्हणाला म्हणून तो विनोद त्याला म्हणाला की, इंग्रजी वाचता येत नाही तर दुकानावर कशाला बसता ? याचा राग येऊन दुकानदार भारत गायकवाड याने विनोदला मारहाण केली. नंतर त्या लहान मुलांनी ही घटना त्याच्या पालकांना सांगितली. नंतर विनोदचे आजोबा यशवंत काळे यांनी दुकानदार भारत जाऊन त्याची विचारणा केली आणि त्यांच्या नातवास का मारल्यास असे म्हणाले आणि घरी आले.
त्या नंतर दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ७:०० वा च्या सुमारास विनोद हा त्याच्या चुलत भावा सोबत विहिरीवर होण्यासाठी जात असताना त्याला सिद्धार्थ गायकवाड, राहुल गायकवाड, विठ्ठल गायकवाड आणि हालसीनाथ गायकवाड या चौघांनी त्यांना
बस स्टॅंडवर गाठून काठीने मारहाण केली व शिवीगाळ केली. ही घटना मुलाच्या घरी माहित होताच त्याच्या घरचे नातेवाईक गेले असता दोन गटात तुंबळ मारामारी झाली. यात बाळासाहेब काळे आणि यशवंत काळे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांचेवर उपचार करून घरी घेऊन आल्या नंतर दि. १८ ऑगस्ट रोजी केज पोलीस ठाण्यात बाळासाहेब काळे यांच्या तक्रारी वरून सिद्धार्थ गायकवाड, राहुल गायकवाड, विठ्ठल गायकवाड, हालसीनाथ गायकवाड, शिवाजी गायकवाड, मिलींद
गायकवाड, प्रकाश गायकवाड, महादेव
गायकवाड, सतीष गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, निलेश गायकवाड, सुनिता गायकवाड आणि ज्योती गायकवाड या १३ जणांच्या विरुद्ध गु.र.नं. ४९३/२०२३ भा.दं.वि. १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.