आदर्श सेवानिवृत मुख्याद्यापक रामराव घाडगे यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रध्दांजली अर्पण
———————————
डाॅ.अंजलीताई घाडगे यांना पितृशोक
———————————-
केज –
शहरातील नालंदा विद्यालयाचे आदर्श सेवानिवृत मुख्याद्यापक तथा सचिव रामराव गणपतराव घाडगे गुरुजी वय ७३ वर्ष यांचे सोलापूर येथील आश्विनी रुग्णालयात गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. ते स्वत: आदर्श मुख्याद्यापक व पत्नी नायब तहसीलदार होऊन सेवानिवृत्त झाले तर त्यांची एक मुलगी ठाणे जिल्ह्याच्या ॲडीशनल एस.पी.तर दुसरी मुलगी डी.आर.डी.सोलापूर येथे सेवा करत आहेत. तिसरी मुलगी डाॅ.अंजलीताई घाडगे या मुख्यमंत्री शिंदे गटाच्या बीड जिल्ह्याच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत. मुलगा दिपक घाडगे हे औंरगांबादचे उप जिल्हाधिकारी होते परंतू त्यांचे २०१९ मध्ये निधन झाले आहे. रामराव घाडगे हे जुलै महीन्याच्या २४ तारखेपासून आजारी होते. उपचारासाठी सोलापूर येथील आश्विनी रुग्णालयात ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार सुरु होते त्यांच्या प्रकृतीने साथ न दिल्याने अखेर गुरुवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.
शुक्रवारी दुपारी शहरातील
कानडी रोडवरील क्रांतीनगर येथील स्माशानभूमित त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. भाजपा नेते रमेशराव आडसकर,
मा.आ.पृथ्वीराज साठे, रणजितसिंह पाटील, न.प.अध्यक्षा सिताताई बन्सोड मॅडम, पशुपतीनाथ दांगट, हनुमंत भोसलेसर, उत्तमआप्पा मस्के, कपिल मस्के, सुमेध शिंदे, अजय भांगे, यांच्यासह पत्रकार, न.प. चे नगरसेवक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वकील, डॉक्टर विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व फुलेनगर येथील नागरिक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी घाडगे परिवाराचे सांत्वन करून श्रध्दांजली अर्पण करून त्यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला.
