वरपगावच्या सरपंच अपात्र
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील वरपगाव येथील महिला सरपंच यांना तीन अपत्ये असल्यामुळे त्या अपात्र झाल्या आहे असे जिल्हाधिकारी बीड यांनी घोषित केले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील वरपगाव जि. बीड येथील सरपंच सौ. निता दादाराव ऊर्फ दादासाहेब कांबळे या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. त्यांना तिसरे अपत्य असल्याने सामाजिक कार्यकर्ते डी बी बनसोडे यांनी त्यांच्या विरुद्ध आक्षेप दाखल करून त्यांना अपात्र घोषित करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी याना विनंती केली होती.
त्या नुसार त्याची सुनावणी होऊन उपलब्ध कागद-पत्रे, अर्जदार आणि गैरअर्जदार यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलमा मधील तरतुदी नुसार सरपंच यांनी तिसऱ्या अपत्याच्या नियमांचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे माधव काळे यांनी निता दादाराव ऊर्फ दादासाहेब सरपंच वरपगाव ता. केज यांना दि.२४/०७/२०२३ रोजी अपात्र घोषित केले आहे.