केज शहरातील गणेश कुलकर्णी सह अनेक तरुणांचा मनसेत प्रवेश
———-
राज्यात राजकारणाचा झालेला चिखल पाहता जनतेची मनसेला साथ – सुमंत धस
——————
केज शहरातील अनेक युवा नेते अतुल कुलकर्णी सह काही तरुणांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे मध्ये प्रवेश केला आहे. गणेश कुलकर्णी गेली अनेक वर्षे केज शहरात सामाजिक,धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्य करत आहेत.
आज घडीला फक्त राज ठाकरे हे एकमेव नेते जनतेचा विचार करून काम करत आहेत, इतर पक्षातील नेते कोण कोणत्या पक्षात आहे हे नागरिकांना समजायला तयार नाही म्हणून जनता व तरुण वर्ग मनसे कडे अपेक्षेने पाहत आहे,जनतेचा भरोसा फक्त राज ठाकरे यांच्यावर राहिला आहे,नागरिकां पर्यंत पोहचा त्यांच्या अडचणी जाणून घ्या व काम करा अशे आव्हान मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी प्रवेशासाठी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गणेश आप्पा कुलकर्णी,अजय कदम यांच्या सह अनेक तरुणांनी मनसे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष गणेश काळे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ओमकार चाटे यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश.
कदम,ज्ञानेश्वर कोरडे, बालाजी शेवाळे,कृष्णा चौरे,निखिल करपे, सुजित पाटील,शैलेश ठोंबरे,अविनाश जाधव, रोहित कदम,संकेत चौरे,राहुल तुपारे, प्रसाद कुलकर्णी, अनिकेत सावंत,तानाजी जाधव, गौरव नखाते,प्रेम शिंदे,अभिषेक सत्वधर,किरण कुलकर्णी, प्रविण नाईकवाडे, सचिन लोंढे, विशाल भूतकर, विकास सिरसट,अशोक मस्के,संदीप सावंत,जयेश पैठणकर,सचिन कांबळे,संदीप लोंढे आदींनी मनसे मध्ये प्रवेश केला आहे
गणेश कुलकर्णी यांच्या सह केज शहरातील अनेक तरुणांनी मनसे मध्ये प्रवेश केल्याने आगामी काळात केज शहरात मनसेची ताकत वाढेल असे चित्र आहे.
