पुलावर उचकटलेल्या आडव्या लोखंडी चॅनल मुळे अपघात टाळण्यासाठी यंत्रणा लागली कामाला पण रस्ते विकास महामंडळ जागचे हलेना !
गौतम बचुटे/केज :- केज-कळंब रोडवर रात्री उघड्या पडलेल्या लोखंडी चॅनेलमुळे अपघात होऊन जिवीतहानी होऊ नये म्हणून युवक, महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. मात्र महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ मात्र जागचे हलत नसल्याने त्यांच्यावर नागरिकांतुन रोष व्यक्त होत आहे.
खामगाव-सांगोला या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८-सी वर केज-कळंब रस्त्यावर साळेगांव जवळ तेलंग आणि आरडकर यांच्या शेताजवळ असलेल्या पुलाला तडे गेल्याने लोखंडी चॅनल उघडा पडला आहे. त्यामुळे रात्री वाहन अडकून अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
सदर माहिती पत्रकार गौतम बचुटे प्रशासनाला दिली आहे. हा प्रकार पाहून काही जागृत वाहनचालक आणि युवकांनी थांबुन वाहन चालकांचे लक्ष वेधण्यासाठी एका काठीला फडके बांधले आहे. तर उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी शरद झाडके, तहसीलदार अभिजित जगताप, पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनी संबंधित विभागाला माहिती दिली आहे. विशेष म्हणजे केज येथुल औरंगाबादला बदली झालेले आणि सद्या तेथे जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा अधिकारी असलेले पुरवठा अधिकारी डी सी मेंढके सुद्दा संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ किंवा ज्या मेगा कंपनीने हा रस्ता केला ती कंपनी मात्र दुर्लक्ष करीत आहे.
———————
माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार अभिजित जगताप, औरंगाबादचे पुरवठा अधिकारी डी सी मेंढके, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि अपघात होऊ नये म्हणून झेंडा लावणारे पाखरे यांचे कौतुक होत आहे.
