बनकरंजा ते मानमोडी वस्ती रस्त्याची दूरावस्था
(शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल)
( तात्काळ रस्ता करा ; ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा)
केज (प्रतिनिधी)
तालुक्यातील बंनकरंजा ते मानमोडी वस्ती हा रस्ता चिखलमय झालेला आहे. या रस्त्यावरून ये जा करणे कठीण झाले आहे. विद्यार्थी, गर्भवती महिला, आजारी,वयोवृद्ध नागरिक मरण यातना सोसत आहेत. रस्ता तात्काळ करण्यात यावा या मागणीसाठी २९ जुलै रोजी ग्रामपंचायत पुढे सामूहिक आत्मदहन करणार येणार असल्याचे निवेदन तहसीलदार अभिजित जगताप यांना देण्यात आले आहे .निवेदनावर
सोमनाथ लांब, अंकुश नागरगोजे ,सिद्धेश्वर नागरगोजे, अनिल नागरगोजे
,महादेव थोरात ,विकास थोरात, परमेश्वर नागरगोजे, राजाभाऊ लांब, सचिन लांब, मोहन थोरात, रामकिसन नागरगोजे, शिवदास नागरगोजे, बळीराम नागरगोजे आदींनी निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे
यापूर्वी वारंवार तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय यांना अर्जाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे मात्र रस्त्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आता थेट आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे तात्काळ रस्ता न झाल्यास आम्ही सर्वजण ग्रामपंचायत पुढे सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले
