केज तालुक्यातील कलसकर यांच्या निवेदनाची घेतली राज्य व्यवस्थापन कक्षाने दखल :
प्रकल्प संचालकने उचित कारवाई करण्याचे आदेश
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील साळेगाव येथील बेघर कुटुंब ज्योतीकांत कळसकर यांच्या निवेदनाची ग्रामीण गृहनिर्माण राज्य कक्षाने दखल घेतली असून त्यावर प्रकल्प संचालकाने योग्य ती कारवाई करावी असे आदेश त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालकांना दिले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, साळेगाव ता. केज येथील ज्योतिकांत कळसकर यांचे कुटुंब बेघर असून ते कच्च्या व पडलेल्या मातीच्या घरात राहतात. सदर घर हे अत्यंत धोकादायक असून पावसाळ्यात धोका होऊ शकतो. अशा आशयाचे निवेदन ज्योतीकांत कळस्कर यांनी ६ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर पाठवले होते. त्याची तात्काळ दखल राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणच्या सहसंचालिका मंजिरी टकले यांनी घेतली. त्या संदर्भात उचित कार्यवाही करण्याचे पत्र त्यांनी दि. १५ जुलै रोजी प्रकल्प संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना दिले आहे.